Swarali Pawar
यंदा पाऊस उशिरा येण्याची शक्यता आहे. अशावेळी घाई न करता योग्य पीक आणि पेरणीचे नियोजन केल्यास नुकसान टाळता येते.
मॉन्सून ३० जून ते ७ जुलैदरम्यान आला तर खरिपातील बहुतांश पिकांची पेरणी करता येते. त्यामुळे हवामानाचा अंदाज लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.
८ ते १५ जुलैदरम्यान पाऊस आला तर मूग, उडीद, भुईमूगऐवजी सोयाबीन, तूर, कापूस, बाजरी, तीळ आणि सूर्यफूल निवडा.
जूनमध्ये पहिला पाऊस पडला म्हणून लगेच पेरणी करू नका. किमान ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे फायदेशीर ठरते.
हलक्या जमिनीत बाजरी, तीळ आणि एरंडी चांगली येतात. मध्यम जमिनीत तूर, सोयाबीन, ज्वारी आणि सूर्यफूल अधिक उत्पादन देऊ शकतात.
उताराला आडवी पेरणी, बांधबंदिस्ती आणि चर तयार केल्यास पावसाचे पाणी शेतातच मुरते. त्यामुळे पिकांना जास्त काळ ओलावा मिळतो.
कापूस + तूर किंवा सोयाबीन + तूर अशी आंतरपीके घेतल्यास जोखीम कमी होते. कमी पावसातही शेतकऱ्यांना स्थिर उत्पादन मिळू शकते.
रासायनिक खतांसोबत सेंद्रिय खतांचा वापर करा. जैविक उपाय, सापळे आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनामुळे खर्च कमी होऊन पीक सुरक्षित राहते.