Swarali Pawar
खोडवा उसात सेंद्रिय खतांचा अभाव असल्यास उत्पादन घटते. शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत आणि जैविक खतांचे मिश्रण एकरी वापरावे.
ऊस तोडणीनंतर १५ दिवसांत युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि एमओपी आवश्यक प्रमाणात द्यावे. दीड महिन्यांनी पुन्हा युरिया द्यावा आणि मोठ्या बांधणीवेळी तिसरी मात्रा द्यावी.
१०:२६:२६ मिश्रखत आणि युरिया १५ दिवसांत द्यावे. दीड महिन्यांनी युरिया आणि मोठ्या बांधणीवेळी मिश्रखत व युरिया द्यावे.
१९:१९:१९ खत १५ दिवसांत दोन पोती द्यावे. दीड महिन्यांनी युरिया आणि मोठ्या बांधणीवेळी १९:१९:१९ सोबत युरिया द्यावे.
फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, मँगनीज सल्फेट आणि इतर सूक्ष्मअन्नद्रव्ये प्रती एकरी द्यावीत. यामुळे पाने हिरवी राहतात आणि ऊसाची वाढ जोमदार होते.
पहिला हफ्ता देताना मूलद्रवी गंधक आणि बगॅसची राख द्यावी. सिलिकॉन जिवाणू दिल्याने ऊस मजबूत आणि रोगप्रतिरोधक बनतो.
सॉइल हेल्थचे द्रावण १५, ४५, ९० आणि १२० दिवसांनी द्यावे. ह्यूमिक ऍसिड खोडवा ठेवल्यानंतर आणि १२० दिवसांनी आळवावे.
६० आणि ९० दिवसांनी मल्टीमॅक्रो व मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी करावी. केवडा नियंत्रणासाठी सूक्ष्मअन्नद्रव्ये आणि युरियाचे मिश्रण १० ते १५ दिवसांनी फवारावे.