Watermelon Purchase: गोड कलिंगड कसं ओळखाल? सोप्या 7 टिप्स!

Swarali Pawar

परफेक्ट कलिंगड निवडायचंय?

बाजारात कलिंगड घेताना गोड आहे की नाही हे ओळखणं थोडं अवघड वाटतं. पण काही सोप्या टिप्स वापरल्या तर तुम्ही सहज गोड आणि रसाळ कलिंगड निवडू शकता.

Watermelon Selection Tips | Agrowon

जमिनीचा डाग बघा

कलिंगड जिथे जमिनीवर टेकलेलं असतं तिथे पिवळा डाग दिसतो. हा डाग गडद पिवळा असेल तर कलिंगड पिकलेलं आणि गोड असतं.

Watermelon Selection Tips | Agrowon

देठ काय सांगतो?

कलिंगडाचा देठ वाळलेला आणि तपकिरी असेल तर ते फळ पिकलेलं असतं. हिरवा देठ दिसला तर कलिंगड कच्चं असण्याची शक्यता जास्त असते.

Watermelon Selection Tips | Agrowon

आवाज ऐका

कलिंगडावर हलकं टिचकी मारल्यावर पोकळ आवाज आला तर ते रसाळ असतं. पातळ किंवा टणक आवाज आला तर ते अजून पूर्ण पिकलेलं नसतं.

Watermelon Selection Tips | Agrowon

रंग आणि पोत तपासा

गडद हिरवा आणि थोडा निस्तेज (मॅट) रंग असलेलं कलिंगड चांगलं असतं. खूप चमकदार साल असेल तर ते कच्चं असण्याची शक्यता असते.

Watermelon Selection Tips | Agrowon

वजनाने ओळखा

कलिंगड हातात घेतल्यावर ते जड वाटलं पाहिजे. जास्त वजन म्हणजे त्यात पाणी आणि गोडवा जास्त असतो.

Watermelon Selection Tips | Agrowon

साखरेचं जाळं पाहा

सालीवर तपकिरी जाळ्यासारख्या रेषा दिसल्या तर ते चांगलं चिन्ह आहे. जास्त जाळं म्हणजे कलिंगड जास्त गोड असण्याची शक्यता असते.

Watermelon Selection Tips | Agrowon

भेसळ ओळखायला विसरू नका

कापल्यावर खूप कृत्रिम लाल रंग किंवा पांढरे डाग दिसले तर सावध राहा. असं कलिंगड टाळा आणि नेहमी नैसर्गिक दिसणारं फळ निवडा.

Watermelon Selection Tips | Agrowon

Summer Crop Care: उन्हाळ्यात भाजीपाला वाचवा! उत्पादन टिकवण्याचे सोपे उपाय

अधिक माहितीसाठी..