Swarali Pawar
रोग वाढीसाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास त्याचा प्रसार वेगाने होतो. यामुळे उत्पादनात मोठी घट येते आणि अपेक्षित उत्पादन मिळत नाही.
"केवडा" रोगात पानावर अनियमित हिरवे-पिवळे चट्टे दिसतात. नवीन पाने पूर्णपणे पिवळी होत असून झाडांना खूप कमी फुले व शेंगा लागतात.
रोगग्रस्त शेंगा लहान, वाकड्या आणि पिवळसर रंगाच्या असतात. उन्हाळ्यात या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळतो.
या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो. जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आणि ऑगस्टमध्ये कमी पाऊस असे वातावरण रोगाला पोषक असते.
रोगपूरक तण जसे बनतुळशी, क्रोटान व भृंगराज यांचा नायनाट करावा. शेतात दिसणारी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावावर नियंत्रणासाठी प्रति हेक्टरी १६० पिवळे चिकट सापळे लावावेत. निंबोळी तेल किंवा ॲझाडिरॅक्टीनची फवारणी करावी.
पांढऱ्या माशी नियंत्रणासाठी पायरीप्रॉक्सिफेन + बायफेनथ्रीन, फिप्रोनिल, इमिडाक्लोप्रिड किंवा थायामेथोक्झाम यापैकी योग्य कीटकनाशकाची फवारणी करावी. फवारणीचे प्रमाण पिकाच्या अवस्थेनुसार ठरवावे.
गरज पडल्यास १२-१५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. प्रत्येक वेळी कीटकनाशक बदलून वापरणे अधिक परिणामकारक ठरते.