Leaf Crinckle in Mung: मुगावरील लिफ क्रिंकलचे असे करा व्यवस्थापन

Swarali Pawar

रोगाची लक्षणे

पाने पिवळसर होऊन हरितद्रव्य कमी होते. पाने वाकडी, शेंगा कमी व लहान येतात आणि झाडांची वाढ खुंटते.

Symptoms of Leaf Crinkle | Agrowon

खोल नांगरणी व काडीकचरा नष्ट करणे

उन्हाळ्यात शेताची खोल नांगरणी करावी. काडीकचरा जाळून नष्ट केल्याने रोगकारक घटक नष्ट होतात.

Deep Ploughing | Agrowon

निरोगी बियाण्याचा वापर

रोगग्रस्त बियाण्यामुळे रोगाचा प्रसार होतो. त्यामुळे नेहमी विषाणूमुक्त व निरोगी बियाणे वापरावे.

Seed Selection | Agrowon

गरम पाण्याची प्रक्रिया

बियाणे ५२ अंश सेल्सिअस पाण्यात २०-३० मिनिटे भिजवावे. यामुळे रोगाचा प्रसार टाळता येतो.

Hot Water Treatment | Agrowon

बीजप्रक्रिया

इमिडाक्लोप्रिड औषधाने बियाण्याची प्रक्रिया करावी. यामुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

Seed Treatment | Agrowon

तणनियंत्रण व आंतरपीक

ईश्वरी, खोटी, चवळी यासारखी तणे काढून टाकावीत. तसेच मूगाबरोबर ज्वारी, बाजरी, मका यांसारखी आंतरपीक घ्यावीत.

Intercultural Operations | Agrowon

खत व्यवस्थापन

नत्रयुक्त खत शिफारशीपेक्षा जास्त देऊ नये. पिकांची फेरपालट केल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.

Fertilizer Application | Agrowon

कीडनाशकाची फवारणी

पिवळे चिकट सापळे शेतात लावावेत. तसेच शिफारस केलेल्या कीटकनाशकांची १०-१५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

Spraying Insecticides | Agrowon

Livestock Compensation: वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशुधनाचे नुकसान झाल्यास भरपाई कशी मिळवावी? किती मिळते शेतकऱ्यांना भरपाई?

अधिक माहितीसाठी...