Swarali Pawar
वाघ, बिबट्या, अस्वल, लांडगा, हत्ती इत्यादी प्राण्यांच्या हल्ल्याने जर पशुधन मृत, जखमी किंवा अपंग झाले तर शेतकऱ्याला भरपाई मिळते.
हल्ल्यानंतर शेतकऱ्याने ४८ तासांत वनक्षेत्रपालाकडे ‘नमुना दोन’ मध्ये अर्ज करावा लागतो. अर्ज मिळाल्यावर वनपाल तीन दिवसांत घटनास्थळी चौकशी करून पंचनामा करतात.
पशुधनाचा मृत्यू झाल्यास, वनपाल येईपर्यंत पशूचे शव हलवू नये. शव हलवले तर भरपाई मिळणार नाही.
शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी तपासणी करून मृत्यू वा इजा वन्य प्राण्यामुळे झाली आहे का ते प्रमाणपत्र देतात.
वनक्षेत्रपाल अहवाल पाहून पशूच्या बाजारभावानुसार नुकसान भरपाई ठरवतो. अर्ज परिपूर्ण असल्यास २० दिवसांत सहायक वनसंरक्षकाकडे पाठवतो.
गाय, म्हैस, बैल मृत झाल्यास बाजारभावाच्या ७५% किंवा जास्तीत जास्त ७० हजार रुपये मिळतात. मेंढी-शेळ्यांना १५ हजार मर्यादा आहे.
पशू अपंग झाल्यास बाजारभावाच्या ५०% किंवा जास्तीत जास्त १५ हजार मिळतात. जखमी झाल्यास उपचार खर्च, जास्तीत जास्त ५ हजार रुपये दिले जातात.
राष्ट्रीय उद्यान- अभयारण्यात गेलेल्या जनावरांना व दहा किलोमीटर परिसरात विषबाधेमुळे मृत पावलेल्या जनावरांना भरपाई मिळत नाही.