Sugarcane Management : कसं असाव खोडवा उसातील खत व्यवस्थापन?

Team Agrowon

खोडवा उसाची अन्नद्रव्याची गरज सुरू उसासारखीच असते. ही मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून द्यावी.

Sugarcane Management | Agrowon

ऊस तुटल्यानंतर १५ दिवसांच्या आत एकरी ५० किलो नत्र, स्फुरद २३ ते २५ किलो, पालाश २३ ते २५ किलो या प्रमाणे द्यावा.

Sugarcane Management | Agrowon

साधारण १३० दिवसांनी तेवढीच खत मात्रा द्यावी. ही खते पहारीच्या साह्याने मुळांच्या सान्निध्यात द्यावीत.

Sugarcane Management | Agrowon

खोडवा पिकास सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसून आल्यास एकरी १० किलो फेरस सल्फेट, ८ किलो झिंक सल्फेट आणि ४ किलो मॅंगेनीज सल्फेट व २ किलो बोरॅक्स ही सूक्ष्म अन्नद्रव्ये सेंद्रिय खतांमध्ये मिसळून द्यावीत.

Sugarcane Management | Agrowon

खोडव्यामध्ये असलेले पाचट कुजून, त्यातील सेंद्रिय कर्ब आणि अन्नद्रव्ये उसाला उपलब्ध होत जातात.

Sugarcane Management | Agrowon

सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीची जलधारण शक्ती वाढते. जमिनीचे इतर भौतिक गुणधर्म सुधारतात. उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते.

Sugarcane Management | Agrowon

शेतातील सर्व पाचट जाळण्याऐवजी जमिनीवर सम प्रमाणात पसरून द्यावे. पाचटाचे आच्छादन तयार झाल्यानंतर जमिनीतून बाष्पीभवन कमी होते. तणांचीही फारशी वाढ होत नाही. जमीन वाफसा अवस्थेत राहण्यास मदत होते.

Sugarcane Management | Agrowon