Anuradha Vipat
15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी सारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी तिरंगा केक बनवून तुम्ही सेलिब्रेशन करु शकता
चला तर आज आपण पाहूयात तिरंगा केक बनवण्याची साधी व सोपी रेसिपी. हि रेसिपी नक्कीचं तिरंगा केक बनवताना तुमच्या कामी येईल.
मैदा, साखर, बटर , दूध , दही , बेकिंग सोडा , बेकिंग पावडर , व्हॅनिला इसेन्स, केशरी, पांढरा आणि हिरवा रंग ,क्रीम
मैदा, साखर, बटर, दूध, दही, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र करून तीन वाटीत पीठ घ्या.
प्रत्येक वाटीत केशरी, पांढरा आणि हिरवा रंग टाका आणि मिक्स करा त्यानंतर ओव्हनमध्ये १८०°C बेक करायला ठेवा .
प्रत्येक रंगाचे पीठ वेगळं बेक करून घ्या. बेक केलेले केक थंड झाल्यावर त्यावर क्रीम लावून घ्या
शेवटी असा होईल तुमचा तिरंगा केक तयार .तसेच तुम्ही तुमच्या आवडीनुसार, केकवर आणखी सजावट करू शकता.