Anuradha Vipat
नवरात्रीच्या उपवासाला काहीतरी वेगळे, पौष्टिक आणि गोड खाण्याची इच्छा असल्यास रताळ्याचा शिरा हा एक उत्तम पर्याय आहे.
कमीत कमी साहित्यात आणि अत्यंत झटपट तयार होणारा हा मऊ-लुसलुशीत शिरा चवीला अप्रतिम लागतो आणि शरीराला ऊर्जाही देतो.
उकडलेली रताळी,साजूक तूप,साखर,दूध,वेलची पूड,ड्रायफ्रूट्सचे तुकडे, काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके.
सर्वप्रथम रताळी स्वच्छ धुवून कुकरमध्ये २-३ शिट्ट्या काढून उकडून घ्या. रताळी थंड झाल्यावर त्यांची साले काढून घ्या आणि ती हाताने चांगली मॅशकरून घ्या . काजू, बदाम आणि पिस्त्याचे तुकडे हलके सोनेरी रंगावर भाजून एका वाटीत काढून ठेवा.
कढईत साजूक तूप घाला. त्यात किसलेली रताळी टाका. मंद आचेवर रताळ्याचा कीस तूपावर ५ ते ७ मिनिटे छान परतून घ्या, जोपर्यंत त्याचा रंग हलका बदलत नाही आणि तूपाचा खमंग सुवास येत नाही.
रताळे व्यवस्थित परतले गेल्यावर त्यात अर्धा कप दूध घाला आणि सर्व मिश्रण चांगले ढवळून घ्या. मिश्रण थोडे घट्ट होऊ लागल्यावर त्यात साखर घाला.
झाकण काढून शिरा पुन्हा एकदा हलवून घ्या. जेव्हा शिरा कढईच्या कडा सोडू लागेल, तेव्हा समजावे की शिरा तयार आहे. शेवटी यामध्ये वेलची पूड आणि आधी तूपात तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करा.