Anuradha Vipat
स्ट्रॉबेरीचा वापर करून तयार केलेला घरगुती स्क्रब ओठ मऊ, गुलाबी आणि चमकदार बनवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो.
स्ट्रॉबेरीमध्ये नैसर्गिक 'अल्फा-हायड्रॉक्सी ॲसिड' आणि व्हिटॅमिन सी असते, जे ओठांवरील मृत त्वचा काढून टाकून त्यांचा काळेपणा दूर करते.
१ पिकलेली स्ट्रॉबेरी
१ चमचा पिठीसाखर किंवा बारीक साखर
१ चमचा शुद्ध मध
आधा चमचा खोबरेल तेल किंवा बदाम तेल
एका लहान वाटीमध्ये स्ट्रॉबेरी चांगली मॅश करून घ्या. त्यामध्ये साखर, मध आणि तेल टाकून सर्व मिश्रण एकत्र करून पेस्ट तयार करा. तुमचा नैसर्गिक लिप स्क्रब तयार आहे.
हा स्क्रब बोटावर घेऊन ओठांवर वर्तुळाकार २ ते ३ मिनिटे अगदी हलक्या हाताने घासून मसाज करा.
मसाज केल्यानंतर स्क्रब ओठांवर आणखी २ मिनिटे तसाच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने किंवा ओल्या रुमालाने ओठ स्वच्छ पुसून घ्या.
स्क्रबिंग करून झाल्यानंतर ओठा ओले असतानाच त्यावर ताबडतोब चांगला लिप बाम किंवा थोडे तूप लावा, जेणेकरून ओठांमधील ओलावा टिकून राहील.