Anuradha Vipat
उकडीचे मोदक गणेश चतुर्थीसाठी बनवण्यात येणारा एक पारंपरिक आणि लोकप्रिय पदार्थ आहे.
चला तर मग आज आपण पाहूयात परफेक्ट उकडीचे मोदक बनवण्यासाठी सोपी रेसिपी
१ कप तांदळाचे पीठ, २ कप पाणी , १ चमचा तूप/तेल, चवीनुसार मीठ, १ कप किसलेला ओला नारळ, १ कप गूळ , २-३ वेलची पूड , १ चमचा तूप
कढईत तूप गरम करा आणि त्यात किसलेला ओला नारळ व गूळ घाला. वेलची पूड घाला आणि शेवटी सारण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा
पाणी गरम करा. पाण्याला उकळी आल्यावर त्यात तूप/तेल आणि मीठ घाला. त्यानंतर हळूहळू तांदळाचे पीठ घाला . पीठ गोळा होईपर्यंत शिजवा त्यानंतर पीठ ५-७ मिनिटे वाफवा.
वाफवलेले पीठ हाताला थोडे तूप लावून मळून घ्या. मळलेल्या पिठाचे छोटे गोळे घ्या त्यानंतर त्याला मोदकाचा आकार देत त्यात नारळ-गुळाचे सारण भरा.
एका चाळणीत मोदक ठेवा. चाळणीला तूप लावून घ्या. मोदक १०-१५ मिनिटे मोदक वाफवून घ्या