Anuradha Vipat
अचानक पाहुणे आल्यावर फक्त १५ ते २० मिनिटांत बनवता येणारी 'शेवयांची खीर हा एक उत्तम आणि चवदार पर्याय आहे.
'शेवयांची खीर चवीला अतिशय अप्रतिम आणि क्रीमी लागते.
शेवया, दूध, साखर, तूप,वेलची आणि जायफळ पावडर, काजू, बदाम, पिस्ते आणि मनुके, केशर.
कढईत २ मोठे चमचे तूप गरम करा. त्यात काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप हलके सोनेरी होईपर्यंत परतून एका वाटीत काढून घ्या.
तुपात १ वाटी शेवया घाला आणि मंद आचेवर २ ते ३ मिनिटे छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
भाजलेल्या शेवयांमध्ये १ लिटर दूध घाला. गॅस मोठा करून दुधाला एक छान उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर गॅस मंद करा आणि शेवया दुधात मऊ शिजू द्या.
शेवया व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात अर्धी वाटी साखर घाला. सोबतच भिजवलेले केशरचे दूध आणि आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स खीरीत मिक्स करा.