Make Paneer At Home : घरच्या घरी साध्या दुधापासून क्रीमी पनीर कसे बनवावे?

Anuradha Vipat

अतिशय सोपे

घरच्या घरी नेहमीच्या साध्या दुधापासून हॉटेलसारखे मऊ आणि क्रीमी पनीर बनवणे अतिशय सोपे आहे.

Make Paneer At Home | agrowon

पौष्टिक आणि चवीला अप्रतिम

घरच्या पनीरमध्ये कोणतेही केमिकल नसल्यामुळे ते आरोग्यासाठी खूप पौष्टिक आणि चवीला अप्रतिम लागते.

Make Paneer At Home | agrowon

साहित्य

दूध १ लिटर, दूध फाडण्यासाठी २ मोठे चमचे लिंबाचा रस किंवा पांढरे व्हिनेगर ,पाणी, बर्फाचे तुकडे किंवा थंड पाणी

Make Paneer At Home | agrowon

कृती

एका मोठ्या पातेल्यात दूध गरम करायला ठेवा. दुधाला एक पूर्ण उकळी येऊ द्या. लिंबाच्या रसात २ चमचे पाणी मिक्स करून पातळ द्रावण तयार करा .

Make Paneer At Home | agrowon

गॅस

दूध फाटायला सुरुवात होईल. जेव्हा हिरवट पाणी आणि पांढरे छन्ना पूर्णपणे वेगळे दिसेल, तेव्हा गॅस ताबडतोब बंद करा.

Make Paneer At Home | agrowon

पनीर गाळणे

पातेल्यात लगेच ४-५ बर्फाचे तुकडे किंवा थोडे थंड पाणी टाका. यामुळे पनीर अतिशय मऊ राहते. स्वच्छ, मऊ सुती किंवा मलमलच्या कपड्यावर फाटलेले दूध ओतून पाणी पूर्णपणे गाळून घ्या.

Make Paneer At Home | agrowon

लिंबाचा आंबटपणा

कपड्यात जमा झालेल्या पनीरवर वरून थोडे स्वच्छ थंड पाणी ओता. यामुळे लिंबाचा किंवा व्हिनेगरचा आंबटपणा आणि वास पूर्णपणे निघून जाईल.

Make Paneer At Home | Agrowon

Open Pores Remedies : ओपन पोअर्सची समस्या कशी दूर करावी?

Open Pores Remedies | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...