Anuradha Vipat
केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी केमिकलयुक्त डाय वापरण्याऐवजी मेंदी आणि नीळ पावडरचा वापर करणे हा सर्वात प्रभावी घरगुती उपाय आहे.
या दोन नैसर्गिक वनस्पतींच्या मिश्रणाने केसांना कोणताही दुष्परिणाम न होता बाजारातील डायसारखाच गडद काळा रंग मिळतो.
मेंदी तुमच्या पांढऱ्या केसांना आधी गडद नारंगी किंवा तांबूस रंग देते, ज्यावर निळीचा रंग व्यवस्थित चढतो.
तुमच्या केसांच्या लांबीनुसार मेंदी, २ चमचे चहापत्तीचे पाणी किंवा कॉफीचे पाणी, आणि १ चमचा लिंबाचा रस.
मेंदी आणि चहापत्तीचे पाणी एकत्र करून रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी मेंदी केसांना लावा आणि २ तास तशीच ठेवा. त्यानंतर केस फक्त साध्या पाण्याने धुवा
नीळ पावडर ही निळ्या रंगाची नैसर्गिक वनस्पती आहे. नीळ मेंदी लावलेल्या तांबूस केसांवर लावली जाते, तेव्हा दोन्ही रंग एकत्र येऊन केसांना परफेक्ट काळा रंग मिळतो.
केस सुकल्यानंतर, एका वाटीत नीळ पावडर घ्या आणि त्यात कोमट पाणी मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावून १ ते १.५ तास ठेवा. त्यानंतर केस फक्त साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.