Anuradha Vipat
आज आपण पाहणार आहोत खव्याचा मोदक कसा तयार करायचा. चला पाहूयात रेसीपी.
खावा (मावा)- 400 ग्रॅम
साखर- 1/4 कप
इलायचीची पावडर -1/4 चमचा
केसर- चिमुटभर
एक पॅन घ्या. पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये खवा आणि साखर टाका.
खवा आणि साखर व्यवस्थित मिसळा. त्यामध्ये केसर टाका या मिश्रणाला घट्ट होईपर्यंत व्यवस्थित शिजवा.
त्यानंतर इलायचीची पावडर टाका थोड्यावेळानंतर गॅस बंद करा.
मिश्रण थंड झाल्यानंतर त्याला मोदकाच्या साच्यामध्ये टाका आणि मोदकाचा आकार द्या
तुमचे चविष्ट खवा मोदक तयार झाले आणि आता या मोदकांचा आस्वाद घ्या