Yogurt : आरोग्यवर्धक योगर्ट बनवतात कसे?

Team Agrowon

लॅक्‍टोबेसिलाय जिवाणूंच्या मदतीने तयार झालेल्या दह्याला योगर्ट म्हणतात. त्यांचे औद्योगिक उत्पादन करताना प्रथिनांचे प्रमाण योग्य राखण्यासाठी दुधात प्रथिनांसाठी दुधाची पावडर मिसळली जाते. 

Yogurt | Agrowon

दूध तापवून कोमट करून त्यात “स्ट्रेप्टोकॉकस थर्माफिलीस व लॅक्‍टोबॅसिलस डेलब्रुकी” या जिवाणूंचे १:१ प्रमाणातील मिश्रण मिसळले जाते. 

Yogurt | Agrowon

लॅक्टिक आम्ल तयार होऊन प्रथिनांचे जेल बनून घट्टपणा येतो.लॅक्‍टोबॅसिलसमुळे “अँसेटालडीहाइड” सारखी संयुगे बनतात. विशिष्ट स्वाद मिळतो. 

Yogurt | Agrowon

योगर्टमध्ये फळांचे रस मिसळून विविध स्वाद निर्माण केले जातात. उदा. स्ट्रॉबेरी योगर्ट, बनाना योगर्ट. योगर्टचे पाश्चरीकरण करून ते जास्त टिकवता येते. त्यातील प्रोबायोटिक गुणधर्म वाढतात.

Yogurt | Agrowon

दही आणि योगर्ट हे दोन्ही पदार्थ जरी सारखे वाटत असले तरी ते एकसारखे नाहीत. हे दुग्धजन्य पदार्थांचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांची चवही जवळजवळ सारखीच असते.

Yogurt | Agrowon

दही आणि योगर्ट हे बनविण्याच्या पद्धतीपासून ते त्यांच्यातील पोषक तत्त्वांपर्यंत सर्वच भिन्न आहे. म्हणून हे दोन्ही पदार्थही वेगवेगळे आहेत.

Yogurt | Agrowon

दह्यामध्ये योगर्टपेक्षा जास्त आंबटपणा असतो. योगर्टच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात.

Yogurt | Agrowon