Dried Fig Making : सुके अंजीर बनत कसं?

Team Agrowon

सुके अंजीर फायदेशीर

फेब्रुवारी–मार्च महिन्यात अंजीर फळांची आवक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे भाव कमी मिळून शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो.अशावेळी सुके अंजीर तयार केल्यास शेतकऱ्यांना फायदा होवू शकतो.

Dried Fig Making | Agrowon

पॉटेशिअम मेटाबायसल्फाइट ची प्रक्रिया

निवडलेली फळे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर फळे मलमलच्या कापडात बांधून पॉटेशिअम मेटाबायसल्फाइटच्या (१ टक्का) उकळत्या द्रावणात ८ ते १० मिनिटे धरावीत. त्यानंतर फळे थंड होण्यास ठेवून द्यावीत. 

Dried Fig Making | Agrowon

गंधकाची प्रक्रिया

फळे थंड झाल्यानंतर प्रतिकिलो फळांस गंधकाची (२ ग्रॅम याप्रमाणे) २ तास धुरी द्यावी. म्हणजे साठवणीच्या काळात बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही.

Dried Fig Making | Agrowon

साखरेच्या पाकाची प्रक्रिया

धुरी दिलेली अंजीर फळे ५० टक्के साखरेच्या पाकात २४ तास भिजत ठेवावीत. फळे पाकातून नितळून काढावीत. ही फळे ड्रायरमध्ये ५० ते ५५ अंश सेल्सिअस तापमानास २४ ते ३६ तास ठेवावीत.

Dried Fig Making | Agrowon

ड्रायरमध्ये वाळविणे

पाकातून काढलेली फळे ड्रायरमध्ये ५० ते ५५ अंश सेल्सिअस तापमानास २४ ते ३६ तास ठेवावीत. जेणेकरून फळांमधील पाण्याचे प्रमाण १६ टक्क्यांपर्यंत येईल आणि फळे सुकतील.

Dried Fig Making | Agrowon

उन्हात वाळविलेली फळे

उन्हामध्ये वाळविलेल्या फळांची गुणवत्ता चांगली मिळत नाही. तसच पाण्याच प्रमाणही १६ टक्क्यांपर्यंत आणण शक्य होत नाही.

Dried Fig Making | Agrowon

पॅकिंग आणि साठवणूक

वाळवलेली फळे थंड करून किचन प्रेसच्या साह्याने चपटी करून पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरावीत. पिशव्या हवाबंद करून थंड, कोरड्या जागी साठवून ठेवावीत. साधारणपणे एक किलो अंजिरापासून २५० ग्रॅम सुके अंजीर मिळत.

Dried Fig Making | Agrowon
Black Turmeric | Agrowon
आणखी पाहा...