Anuradha Vipat
केस गळती थांबवण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी कढीपत्ता तेल तेल उपयुक्त आहे असे मानले जाते.
कढीपत्ता तेलाचा उपयोग केसांसाठी किंवा अन्नात चव वाढवण्यासाठी केला जातो. चला तर मग पाहूयात कढीपत्ता तेल कसं बनवायचं.
एक कप ताजा किंवा वाळलेला कढीपत्ता, दोन कप नारळ, सूर्यफूल किंवा तिळाचे तेल.
कढईत तेल गरम करा. गरम झाल्यावर त्यात कढीपत्ता टाका.
मंद आचेवर १०-१५ मिनिटे शिजवा. अधूनमधून ढवळत राहा. गॅस बंद करून तेल थंड होऊ द्या.
तेल थंड झाल्यावर गाळून घ्या. काचेच्या बाटलीत भरून ठेवा.
कढीपत्ता तेलाचा वापर करण्यापूर्वी ते तुमच्या त्वचेला किंवा टाळूला ऍलर्जी करत नाही ना याची खात्री करण्यासाठी पॅच टेस्ट करा.