Misal Pav Recipe : घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी झणझणीत मिसळ पाव

Anuradha Vipat

साहित्य

मोड आलेली मटकी, कांदे,टोमॅटो, सुके खोबरे, आलं-लसूण पेस्ट, मिसळ मसाला, लाल तिखट, हळद, कढीपत्ता, तेल आणि मीठ. सोबतीला फरसाण, बारीक चिरलेला कांदा, लिंबू आणि पाव.

Misal Pav Recipe | agrowon

वाटण

तेल गरम करून चिरलेला कांदा आणि सुके खोबरे तांबूस रंगावर भाजून घ्या. त्यात आलं आणि लसूण टाकून मिक्सरला बारीक वाटून घ्या.

Misal Pav Recipe | agrowon

मटकी शिजवणे

मटकीमध्ये थोडे पाणी, हळद आणि मीठ घालून कुकरला १ शिट्टी काढून मटकी शिजवून घ्या.

Misal Pav Recipe | agrowon

तर्री बनवणे

कढईत तेल गरम करा, तेलात जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकून परता. खोबरे-कांद्याचे वाटण तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्या. त्यात हळद, लाल तिखट आणि २ चमचे मिसळ मसाला घाला.

Misal Pav Recipe | agrowon

मिसळ

या मसाल्यात शिजवलेली मटकीटाका. गरजेनुसार आणखी थोडे कोमट पाणी आणि चवीनुसार मीठ घाला. मंद आचेवर १० मिनिटे उकळू द्या.

Misal Pav Recipe | agrowon

सर्व्हिंग

प्लेटमध्ये आधी शिजवलेली मटकी घ्या, त्यावर भरपूर फरसाण, बारीक कांदा आणि कोथिंबीर टाका.

Misal Pav Recipe | agrowon

चमचमीत मिसळ

कडेने गरम-गरम रस्सा (कट) ओता. लिंबू आणि बटर लावलेल्या पावासोबत चमचमीत मिसळ सर्व्ह करा!

Misal Pav Recipe | agrowon

Horoscope 22 July 2026 : ग्रहांच्या बदलामुळे आजचा दिवस सर्व राशींसाठी ठरेल महत्त्वपूर्ण आणि संमिश्र फळ देणारा

Horoscope 22 July 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...