Mahesh Gaikwad
सोलकढी हे पेय कोकण, गोवा आणि कोल्हापूर या भागातील प्रसिध्द चविष्ट आणि आरोग्यदायी पेय आहे. जेवणानंतर अन्न पचनासाठी ते आवर्जून पितात.
घरच्या घरी चविष्ट आणि आरोग्यदायी सोलकढी बनविण्यासाठी कोकम फुले, ओला नारळ, लसूण, मिरची, जिरे, मीठ हे घरी सहज घरी उपलब्ध होणाऱ्या साहित्याची आवश्यकता असते.
कोकम फुले १५ ते २० मिनिटे कोमट पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे त्याचा रंग आणि चव उत्तम प्रकारे बाहेर येते.
ओल्या नारळात थोडेसे पाणी घालून मिक्सरमधून वाटून त्याचे दूध काढा. त्यानंतर आता हे दूध गाळून गार करण्यासाठी बाजूला ठेवा.
लसूण, मिरची आणि जिरे एकत्र वाटून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टमुळे सोलकढीला झणझणीत स्वाद येतो.
भिजवलेला कोकम रस, नारळाचे दूध, मसाला पेस्ट आणि मीठ एकत्र करून नीट हे मिश्रण चांगले एकजीव करा. गरज असल्यास थोडंसं पाणी टाका.
त्यानंतर तयार झालेले सोलकढीचे मिश्रण काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा. सर्व्ह करताना वरून कोथिंबीर आणि हिंगाचा हलका स्वाद द्या.
सोलकढी पचनासाठी उपयुक्त असून ती शरीराला थंडावा आणि ताजेपणा देते. नैसर्गिक अँटीऑक्सिडंट म्हणूनही ती लाभदायक आहे.