Anuradha Vipat
योग्य फॅशन आणि स्टायलिंगच्या मदतीने तुम्ही प्रत्यक्ष उंचीपेक्षा अधिक उंच आणि आकर्षक दिसू शकता.
कपड्यांची निवड, रंगसंगती, फिटिंग आणि अॅक्सेसरीज यांचा तुमच्या एकूण लुकवर मोठा प्रभाव पडतो.
उभ्या रेषांचे डिझाइन शरीर लांब आणि सडपातळ दिसण्यास मदत करते.
एकाच रंगाच्या किंवा जवळपास सारख्या रंगछटांच्या कपड्यांमुळे शरीराची लांबी अधिक दिसते. त्यामुळे मोनोक्रोम आउटफिट्स उंच दिसण्यासाठी उत्तम पर्याय ठरतात.
हाय-वेस्ट जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यामुळे पाय लांब दिसतात आणि संपूर्ण व्यक्तिमत्त्व अधिक उंच वाटते.
अतिशय सैल किंवा खूप टाइट कपडे टाळा. शरीराला व्यवस्थित फिट होणारे कपडे तुमचा लुक अधिक आकर्षक बनवतात.
V-नेक टॉप्स, कुर्त्या किंवा ड्रेस मान आणि शरीर अधिक लांब दिसण्यास मदत करतात.