Team Agrowon
चिंचेचे झाड टिकाऊ, चिवट, दणकट, किडी- रोगांना फारसे बळी न पडणारे, बहुवर्षीय आहे.
चिंचेची गावरान झाडे उशिरा उत्पादन देतात. कलमे केलेली झाडे सुमारे सात ते आठ वर्षांपासून उत्पादन देण्यास सुरवात करतात.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने चिंचेचे काही वाण विकसित केले आहेत. यात प्रतिष्ठान, नंबर २६३, योगेश्वरी, अजिंठा असे वाण आहेत. यातील काही वाण गोड्या चिंचेचे आहेत.
नगर ही फोडलेल्या चिंचांसाठी सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. अनेक जिल्ह्यांबरोबर औरंगाबादची चिंचही येथे येते. नगरच्या खालोखाल बार्शी व लातूरची बाजारपेठ आहे. चिंचोक्यांसाठी मात्र बार्शीची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे.
लाल रंगाच्या गरापेक्षा पिवळ्या रंगाच्या गराला चांगला दर मिळतो. सुपर पिवळा ही सर्वोत्तम ‘ग्रेड’ समजली जातो.
नगर जिल्ह्यातून दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात चिंच पाठवली जाते. येथून निर्यातही होते.
चिंचोक्याचा उपयोग कापड उद्योग, कुंकू, बुक्का तयार करणे, स्टार्च, पेक्टीन व टॅनीनसाठी केला जातो. टरफल, शिरा वीटभट्टीवाले विकत घेऊन जातात.
Tendu Tree Benefits : तेंदू वृक्षाची फक्त पानेच उपयोगी नाही तर फळे, बिया आणि सालही फायद्याची