Livestock Summer Care: उन्हाळ्यात जनावरांसाठी ठेवा थंडगार गोठा! गारव्यासाठी सोपे ६ उपाय

Swarali Pawar

ऊन वाढतंय, जनावरांची काळजी घ्या!

मार्चपासून तापमान हळूहळू वाढू लागते आणि जनावरांवर उष्णतेचा ताण येतो. म्हणूनच उन्हाळ्यात गोठा थंड आणि हवेशीर ठेवणे खूप महत्त्वाचे असते.

cattle shed ventilation | Agrowon

जनावरांवर परिणाम?

जास्त उष्णतेमुळे जनावरांची भूक कमी होते आणि दूध उत्पादन घटते. कधी कधी उष्माघात, अपचन आणि अशक्तपणासारखे त्रासही होऊ शकतात.

livestock heat protection | Agrowon

गोठा हवेशीर असणे गरजेचे

उन्हाळ्यात गोठ्यात हवा खेळती राहील अशी रचना असावी. भिंती मोकळ्या ठेवाव्यात किंवा पडदे लावून वायुवीजन ठेवावे.

summer animal shelter | Agrowon

दिशा आणि उंची

गोठ्याची दिशा दक्षिण-उत्तर ठेवली तर थेट ऊन आत येत नाही. तसेच गोठ्याची उंची १० ते १२ फूट असल्यास गरम हवा वर जाते.

Direction And Height of Shed | Agrowon

छतावर साधे उपाय

पत्र्याच्या छतावर पांढरा रंग दिल्यास ऊन परावर्तित होते. छतावर कडबा किंवा पालापाचोळा टाकल्यास गोठा थंड राहतो.

livestock shed design | Agrowon

गारव्यासाठी सोपे उपाय

गोठ्यात पाण्याने ओले केलेले गोणपाटाचे पडदे लावता येतात. पंखे, कुलर किंवा फॉगर्स वापरल्यास वातावरण थंड राहते.

dairy shed cooling | Agrowon

पाणी आणि स्वच्छता

जनावरांना दिवसभर स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध असावे. गोठ्यातील मलमूत्र वेळोवेळी साफ केल्यास उष्णता आणि दुर्गंधी कमी होते.

Water and Cleanliness | Agrowon

मुक्त संचार गोठा

गोठ्याभोवती सावली देणारी झाडे लावल्यास वातावरण थंड राहते. दिवसातून २–३ वेळा पाणी फवारल्यास जनावरांना आराम मिळतो.

cattle welfare summer | Agrowon

Cold Storage For Summer: उन्हाळ्यात फळ-भाजीपाला वाचवा! शीतगृहाचे महत्त्व आणि फायदे

Agrowon
अधिक माहितीसाठी...