Swarali Pawar
सध्या तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. यामुळे उसाच्या वाढीवर आणि फुटव्यांवर परिणाम होतो.
जास्त तापमानामुळे माती गरम होते आणि मुळांची वाढ कमी होते. पाण्याचा ताण आल्यावर पाने पिवळी पडतात आणि उत्पादन घटते.
उसाच्या शेतात पाचट किंवा सेंद्रिय आच्छादन करणे फायदेशीर ठरते. यामुळे जमिनीतला ओलावा टिकतो आणि मातीची सुपीकता वाढते.
ह्युमिक अॅसिड आणि अॅसिटोबॅक्टरची फवारणी केल्याने फायदा होतो. यामुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणू वाढून पिकाची वाढ सुधारते.
उन्हाळ्यात उसाला नियमित पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. पाण्याची उपलब्धता कमी असल्यास ठिबक सिंचन वापरणे फायदेशीर ठरते.
नत्र, स्फुरद आणि पालाश ही खते शिफारशीनुसार द्यावीत. यामुळे उसामध्ये फुटवे चांगले फुटतात आणि वाढ सुधारते.
म्युरेट ऑफ पोटॅशची २ टक्के फवारणी केल्यास पिकाला फायदा होतो. यामुळे पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते.
कडक उन्हात MOP किंवा केवोलिनची फवारणी केल्यास बाष्पीभवन कमी होते. ६ टक्के केओलिनच्या फवारणीमुळे उसाची वाढ चांगली राहते आणि उत्पादन टिकते.