Swarali Pawar
ऊस हे सिलिकॉन साठवण करणारे पीक आहे. नत्र, स्फुरद, पालाशपेक्षा उसात सिलिकॉनचं प्रमाण जास्त असतं.
सिलिकॉन पानांच्या पेशीभित्तीत साठतो. पाने जाड, मजबूत होऊन झाड सरळ उभं राहतं.
सिलिकॉनमुळे ऊस लोळत नाही. सरळ वाढ झाल्याने प्रकाशसंश्लेषण वाढतं.Agrowon
फुटव्यांची संख्या, उंची आणि कांडीची जाडी वाढते. साखरेचा गोडवा आणि साठवण क्षमता सुधारते.
उन्हाळ्यात जमिनीचं तापमान कमी राहते. पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
जमिनीत भेगा पडण्याचं प्रमाण कमी होतं. पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं.
नत्राचा निचरा कमी होतो. स्फुरद व पालाश अधिक उपलब्ध होतात.
जमिनीत सिलिकॉन कमी झाल्याने उत्पादन घटतं. कॅल्शिअम व मॅग्नेशिअम सिलिकेटद्वारे सिलिकॉन द्यावा.