Cow Diseases: थंडीमुळे दूध घटतंय? गाईंमधील आजारांची लक्षणे ओळखा

Swarali Pawar

थंडीचा गाईंवर परिणाम

थंड वातावरणात गाईंच्या शरीरावर ताण येतो. यामुळे त्या अशक्त होतात आणि प्रतिकारशक्ती कमी होते.

Cow Disease Symptoms | Agrowon

गाभण व दुधाळ गाई धोक्यात

हिवाळ्यात अनेक गाई प्रसूतीच्या टप्प्यात असतात. थंडी व आहार कमी झाल्याने दूध उत्पादन घटते.

Cow Disease Symptoms | Agrowon

हिवाळ्यात होणारे प्रमुख आजार

दुग्धज्वर, कितनबाधा, मायांग बाहेर येणे असे आजार दिसतात. तसेच हायपोमॅग्नेसेमिक टीटॅनी व लालमूत्र आजार होतो.

Cow Disease Symptoms | Agrowon

थंडीची सुरुवातीची लक्षणे

गाईंचे शरीराचे तापमान खूप कमी होते. कान, नाक व पाय थंड पडतात आणि भूक कमी होते.

Cow Disease Symptoms | Agrowon

शरीरातील बदल

रवंथ प्रक्रिया बंद होते व श्वसन मंदावते. हृदयाचे ठोके कमी होऊन दूध उत्पादन घटते.

Cow Disease Symptoms | Agrowon

दुग्धज्वर व कितनबाधा लक्षणे

दुग्धज्वरात गाय बसून राहते व उठू शकत नाही. कितनबाधेत गोडसर वास येतो आणि खुराक खाल्ला जात नाही.

Cow Disease Symptoms | Agrowon

लालमूत्र आजाराची ओळख

या आजारात लघवी कॉफीच्या रंगाची दिसते. प्रसूतीनंतर गाई-म्हशींमध्ये हा आजार जास्त आढळतो.

Cow Disease Symptoms | Agrowon

धोका व सावधगिरी

शरीराचे तापमान फार घटल्यास गाय कोमात जाऊ शकते. वेळीच उपचार न केल्यास मृत्यूचा धोका संभवतो.

Cow Disease Symptoms | Agrowon

Chana Diseases: मर रोगाचा धोका वाढतोय! हरभरा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स?

Agrowon
अधिक माहितीसाठी..