Team Agrowon
कर्बाचे विविध प्रकार असून, जैविक आणि वनस्पतिजन्य कार्बनी घटकांपासून तयार होणाऱ्या कर्बाला सेंद्रिय कर्ब म्हणून ओळखले जाते.
कृषिक्षेत्रात पिकांच्या वाढीमध्ये सर्वाधिक सहभाग याच मातीतील सेंद्रिय कर्बाचा असतो. सेंद्रिय कर्बाचे मुबलक प्रमाण असलेल्या जमिनीतून पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ती सर्व मूलद्रव्यांची उपलब्धता वाढते.
पिकांची नियमित फेरपालट करून, त्यात पीक पद्धतीमध्ये किंवा आंतरपीक म्हणून कडधान्य पिकांचा समावेश करणे.
शिफारशीप्रमाणे दरवर्षी सेंद्रिय खत शेवटच्या कुळवाच्या पाळीआधी जमिनीत मिसळावे.
क्षारपड जमिनीत धैंचा किंवा ताग अशा हिरवळीची खतपिके जमिनीत पेरून फुलोऱ्यावर येण्यापूर्वी जमिनीत गाडावीत. उसासारख्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून ताग पेरून गाडावा.
उभ्या पिकात निंबोळी पेंडीचा वापर करावा.
पीक अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करावा. उदा. खोडवा उसाचे पाचटाचे नियोजन करावे.
शेतीची पशुसंगोपनातून उपलब्ध होणाऱ्या शेण, कोंबडखत, शेळीच्या लेंड्या यांचा भरपूर प्रमाणात वापर करावा.