Anuradha Vipat
स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी मेंदूला योग्य पोषण आणि मानसिक व्यायाम मिळणे आवश्यक असते.
चुकीचा आहार, अपुरी झोप आणि मानसिक तणाव यामुळे अनेकदा गोष्टी विसरण्याची समस्या निर्माण होते.
बदाम आणि अक्रोड हे मेंदूसाठी सर्वोत्तम अन्न मानले जातात. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स असतात, जे मेंदूच्या पेशींचे आरोग्य सुधारतात.
आयुर्वेदात शंखपुष्पी आणि ब्राह्मी या वनस्पतींना 'मेध्य रसायने' म्हणजेच स्मरणशक्ती वाढवणारी औषधे म्हटले आहे. हे मेंदूतील रक्तप्रवाह सुधारतात आणि मानसिक थकवा कमी करतात.
मेंदूचा ६०% भाग हा चरबीने बनलेला असतो आणि त्याला चांगल्या फॅट्सची गरज असते. आहारात शुद्ध गाईच्या तुपाचा समावेश केल्याने मेंदूच्या पेशींना पोषण मिळते.
जर झोप अपुरी असेल तर मेंदू माहिती साठवू शकत नाही आणि आपण गोष्टी विसरू लागतो. त्यामुळे रोज रात्री ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे अनिवार्य आहे.
मेंदू सक्रिय ठेवण्यासाठी दररोज किमान १५ मिनिटे 'माइंड गेम्स' खेळा. यासोबतच रोज सकाळी १० मिनिटे दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा.