Anuradha Vipat
कोअर स्ट्रेंथ म्हणजे केवळ 'ॲब्स' नव्हे, तर तुमच्या पाठीचा कणा, कंबर आणि पोटाचे स्नायू मजबूत करणे होय.
जमिनीवर उपडे झोपून कोपरांवर आणि पायांच्या चवड्यांवर शरीराचा भार पेलून धरा. शरीर एका सरळ रेषेत ठेवा.
दोन्ही गुडघे आणि हातांवर उभे राहा. आता उजवा हात पुढे आणि डावा पाय मागे सरळ करा. १० सेकंद थांबून दुसऱ्या बाजूने करा.
जमिनीवर बसून पाय थोडे वर उचला आणि हात पायांच्या समांतर पुढे करा. पोटाच्या स्नायूंवर ताण येईपर्यंत स्थिर राहा
पायांवर आणि खांद्यांवर भार देऊन कंबर वर उचला. पोटाचे स्नायू घट्ट करा आणि काही सेकंद तसेच राहा.
पाठीवर झोपून हात आणि पाय ९० अंशात वर करा. आता उजवा हात मागे आणि डावा पाय खाली जमिनीच्या दिशेने न्या.
व्यायाम करताना श्वास रोखून धरू नका, संथपणे श्वास घेत राहा. दिवसातून फक्त १०-१५ मिनिटे हे व्यायाम रोज करा.