Swarali Pawar
२३–२७°C तापमान आणि ८०% पेक्षा जास्त आर्द्रता असली की मर रोग वाढतो. आम्लीय जमीन (pH ५–५.९) असल्यास रोगाचा धोका अधिक असतो.
उगवणीनंतर १५–२० दिवसांत मर रोगाची लक्षणे दिसू लागतात. पण पिकाच्या कोणत्याही अवस्थेत हा रोग दिसू शकतो.
झाडांची पाने सुकतात, पिवळी पडतात आणि गळून पडतात. फुले व घाटे कमी लागून पीक आडवे पडते.
मुळांचा भाग कोरडा व काळसर दिसतो. उपमुळे व उपयुक्त जिवाणूंच्या गाठी आढळत नाहीत.
शेताची वारंवार पाहणी करावी, लवकर निदान होतो. खोल नांगरट केल्याने रोगकारक घटक नष्ट होतात.
रोगविरहित बियाणे वापरून पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. ट्रायकोडर्मा व्हिरीडी जैविक बुरशीनाशक प्रभावी ठरते.
दाट पेरणी टाळावी, गरज असल्यास विरळणी करावी. पूर्वी लसूण, कांदा, टोमॅटो घेतलेल्या शेतात हरभरा टाळावा.
शेणखतात जैविक बुरशीनाशक मिसळून वापरावे. हुमणी, वायरवर्मसारख्या मुळांना इजा करणाऱ्या किडींचे नियंत्रण करावे.