Rag Weed : विषारी `रॅगवीड’ तण कसे ओळखाल?

Team Agrowon

अनेक परदेशी तणांनी भारतात प्रवेश करून इथल्या शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यापैकीच रॅगवीड हे तण आहे.

Rag Weed | Agrowon

रॅगवीड हे परदेशी तण असून या विषारी तणाचा शेतीबरोबरच मानवी व जनावरांच्या आरोग्यावरही घातक परिणाम होऊ शकताे.

Rag Weed | Agrowon

पाने साधी मात्र लहान भागात विभागलेली, कातरलेली व लवयुक्त असतात. फुले येण्यापूर्वी हुबेहूब कॉंंग्रेस गवतासारखी दिसते.

Rag Weed | Agrowon

फुले जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत येतात. फुले लहान, पांढरट-पिवळसर रंगाची. गोलाकार पुष्पगुच्छात येतात.

Rag Weed | Agrowon

हे तण वेगाने वाढते व पसरते. प्रामुख्याने शेतात तसेच गवताळ कुरणे, ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेने, नदी काठावर आढळते.

Rag Weed | Agrowon

हे तण जनावरांसाठीही विषारी. तणाच्या सान्निध्यात आल्यास त्यांनाही ॲलर्जीचा त्रास. उग्र वासामुळे जनावरे हे तण खात नाहीत. अन्य चाऱ्यांसोबत ते खाल्ल्यास दुधास उग्र वास येतो.

Rag Weed | Agrowon

तणनाशक फवारुन या तणाचे नियंत्रण करता येते. मात्र त्याचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Rag Weed | Agrowon