Safflower Aphids : करडई वरील माव्याचा प्रादुर्भाव कसा ओळखाल?

Team Agrowon

सध्या करडई पीक अंतिम फुलोरा अवस्था आणि बोंड अवस्थेत आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे सध्या करडई पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. त्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Safflower Aphids | Agrowon

मावा किडीची पिल्ले लालसर तपकिरी तर प्रौढ काळ्या रंगाचे अर्धगोलाकार असतात. प्रौढांमध्ये पंख असलेले व पंख नसलेले असे दोन प्रकार असतात.

Safflower Aphids | Agrowon

प्रौढ मादी एकावेळी सुमारे ३० पिलांना जन्म देते. पिलांची वाढ ७ ते ९ दिवसांत पूर्ण होते.

Safflower Aphids | Agrowon

जास्त प्रजनन क्षमता आणि एक पिढी पूर्ण होण्यासाठी लागणारा कमी वेळ यामुळे प्रादुर्भावानंतर किडीच प्रमाण झपाट्यान वाढत जात.

Safflower Aphids | Agrowon

मावा किडीची पिले व प्रौढ सोंडेद्वारे झाडातील अन्नरस शोषतात. रसशोषण करताना किड गोड चिकट पाणी सोडते. या चीकट पाण्यावर नंतर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे झाडाच्या अन्ननिर्मिती प्रक्रियेत अडचण येते.

Safflower Aphids | Agrowon

जास्त प्रादुर्भाव झाल्यास फुले लागण्याआधीच झाडे वाळून जातात. त्यामुळे झाडाच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात ५५ ते ८० टक्क्यांपर्यंत घट येते.

Safflower Aphids | Agrowon

करडईच्या पेरणीला जर उशीर झाला तर प्रादुर्भाव वाढत जातो. त्यामुळे करडईची पेरणी वेळेत करावी.

Safflower Aphids | Agrowon