GI Tag : महाराष्ट्राच्या चिंच, ज्वारीसह ९ पदार्थांना GI टॅग; ९ पैकी ६ एकट्या मराठवाड्यातील

Aslam Abdul Shanedivan

GI टॅग म्हणजे भौगोलिक संकेतस्थळ चिन्ह.

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील चिंच, ज्वारीसह ९ पदार्थांना भौगोलिक निर्देशांक म्हणजेच GI टॅग देण्यात आला.

GI Tag | Agrowon

मराठवाड्यातील ६ पदार्थ

चिंच, ज्वारीसह ९ पदार्थांना देण्यात आलेल्या GI टॅगमध्ये मराठवाड्यातील ६ पदार्थांचा समावेश आहे. ज्यात तूळजापूरच्या कवडीची माळ आणि कुंथलगिरीचा खवा आहे.

GI Tag | Agrowon

दगडी ज्वारी

दगडी ज्वारी म्हटलं की समोर येतो तो जालना जिल्हा. ही ज्वारी टणक असल्याने ती पक्ष्यांना फोडता येत नाही. तर याचे जीआय नामांकन देण्याचे काम पुण्यातील गणेश हिंगमिरे करतात.

GI Tag | Agrowon

कुंथलगिरीचा खवा

धाराशीव जिल्ह्यातील भूम तालुक्यात दूधापासून खव्याची निर्मिती होते.

GI Tag | Agrowon

तुळजापूरची कवडी

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर हे धार्मिक स्थळ आहे. येथे हजारो भाविक भेट देतात. ते कवड्यांची माळ घालतात. छत्रपती शिवाजी महाराज हे देखील ही माळ घालत असत.

GI Tag | Agrowon

पानचिंचोली चिंच

लातूर जिल्ह्यातीलच पानचिंचोली या गावातील चिंचेला जीआय नामांकन मिळाले आहे. या चिंचेचा आकार सहा ते आठ इंचांपर्यंत असतो. तर ही ३०० वर्षांपासून प्रसिद्ध आहे.

GI Tag | Agrowon

बोरसुरी डाळ

लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात बोरसुरी हे गाव असून येथील वरण (डाळ) फार चवीने खाल्ली जाते. त्यामुळे यालाही जीआय नामांकन मिळाले आहे.

GI Tag | Agrowon

कास्तीची कोथिंबीर

तांदळाला जसा वास असतो. तसाच वास लातूर जिल्ह्यातील कास्ती भागात कोथिंबिरीला आहे. जो इतर कोथिंबिरीपासून याला वेगळा करतो. मुंबई, नागपूर या मोठ्या शहरात मागणी आहे.

GI Tag | Agrowon

Aditya L-1 spacecraft : ‘आदित्य’ ‘एल-१’ यान झेपावले; होणार सूर्याचा अभ्यास!