Muskmelon Selection Tips: गोड खरबूज कसं ओळखाल? ५ सोप्या टिप्स!

Swarali Pawar

गोड खरबूज निवडायचंय?

बाजारात खरबूज घेताना ते गोड आहे की नाही हे ओळखणं कठीण वाटतं. पण काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही उत्तम खरबूज निवडू शकता.

Muskmelon Selection Tips | Agrowon

सुगंध

खरबूजाच्या देठाजवळ वास घ्या, गोड सुगंध येत असेल तर ते पिकलेलं असतं. जर काहीच वास येत नसेल, तर ते अजून कच्चं असण्याची शक्यता असते.

Muskmelon Selection Tips | Agrowon

सालीवरील जाळी

खरबूजावर स्पष्ट आणि जाड जाळीसारखी रचना असेल तर ते गोड असतं. तसंच त्याचा रंग हिरवा नसून पिवळसर-सोनेरी असावा.

Muskmelon Selection Tips | Agrowon

स्पर्शाने तपासा

खरबूज हलकं दाबल्यावर थोडं मऊ वाटलं तर ते योग्य पिकलेलं असतं. खूप मऊ असेल तर ते सडलेलं आणि खूप कडक असेल तर कच्चं असतं.

Muskmelon Selection Tips | Agrowon

वजन तपासा

खरबूज उचलून बघा, ते आकाराच्या तुलनेत जड वाटलं पाहिजे. जास्त वजन म्हणजे ते अधिक रसाळ आणि चवदार असतं.

Muskmelon Selection Tips | Agrowon

देठाचा भाग तपासा

देठाजवळ हलक्या भेगा दिसल्या तर खरबूज नैसर्गिकरित्या पिकलेलं असतं. हे चांगल्या दर्जाच्या खरबूजाचं महत्त्वाचं लक्षण आहे.

Muskmelon Selection Tips | Agrowon

खराब खरबूज टाळा

खूप दबलेलं किंवा पिचलेलं खरबूज घेऊ नका. असं फळ घेतल्यास जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते.

Muskmelon Selection Tips | Agrowon

योग्य निवड करा

या सोप्या टिप्स वापरून तुम्ही दरवेळी गोड आणि ताजं खरबूज निवडू शकता. आता बाजारात फसू नका, स्मार्टपणे खरबूज खरेदी करा!

Muskmelon Selection Tips | Agrowon

Watermelon Purchase: गोड कलिंगड कसं ओळखाल? सोप्या 7 टिप्स!

अधिक माहितीसाठी..