Team Agrowon
जनावर नेहमी प्रमाणे खात नाही. हे सहसा पहिले लक्षण आहे. चारा खाताना किंवा पाणी पिताना चारा-पाणी तोंडावाटे बाहेर येते.
रवंथ करण्याची क्रिया मंदावते किंवा बंद होते. कित्येकदा पोटातील चारा मिश्रित पाणी नाकावाटे बाहेर येते.
टाळी वाजवून अगर हाक मारून अशा जनावराचे लक्ष वेधले असता कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही, अंगास हात लावला असता कातडी थरथर करीत नाही.
काही वेळा आजारी जनावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करते, जसे दूर पळणे किंवा अंगावर धावून येणे इत्यादी. जनावरांची नजर, कानाच्या हालचालींवरून प्रतिक्रिया अजमावता येतात.
जनावरे अस्वस्थता दर्शविणाऱ्या हालचाली करतात, जसे सतत ऊठ-बस करणे, लाथ उडविणे, शेपटी उंचावून उभे राहणे, भिंत, झाड अगर जमिनीला टकरा मारणे, कोणताही पदार्थ चघळत राहणे इत्यादी.
जनावर पाय लांबवून पडून राहते. उठविल्यास उठण्याचा किंवा उभे असल्यास चालण्याचा प्रयत्न करीत नाही. जनावर कर्कश किंवा हळू हंबरत राहते.
एखादा पाय उंचावून किंवा एकाच पायावर भार टाकून, पाठ वाकवून किंवा सतत कुंथत उभे राहते.पाय ओढत, लंगडत, अडखळत चालते किंवा स्वतःभोवती गोल गोल फिरत राहते.