Mahesh Gaikwad
कोल्हापूरी चप्पल घालण्याची अनेकांना हौस असते, पण बाजारात कोल्हापूरीच्या नावाने हुबेहुब दिसणाऱ्या परंतु कमी दर्जाच्या नकली चपला ग्राहकांच्या माथी मारल्या जातात.
हाताने बनविलेली आणि परंपरेचा वारसा सांगणारी अस्सल कोल्हापूरी चप्पल कशी ओळखयाची? यासाठी काही टीप्स.
कोल्हापूरी चप्पल बनविण्याासाठी म्हैस किंवा बैलाच्या चामडे वापरतात. जे टिकाऊ आणि मजबूत असते.
अस्सल कोल्हापूरी चप्पल पूर्णतः हाताने बनवली जाते. ही चप्पल बनविताना कोणत्याही प्रकारच्या मशीनचा वापर होत नाही. चपलेचे शिवणकाम व कटिंगही हातानेच केले जाते.
कोल्हापूर चप्पलची खासियत म्हणजे तिची बनावट आणि नक्षीकाम. चपलेवरील हे नक्षीकाम, टाकी आणि कलाकुसर हे सुध्दा हातानेच केले जाते.
अस्सल कोल्हापूरी चप्पलांना कृत्रिम वास नसतो. नैसर्गिक लेदरचा खास गंध जाणवतो. अस्सल चपलांचा रंग नैसर्गिक असतो. विशेषतः तपकिरी किंवा काळसर.
अस्सल कोल्हापूरी चप्पल वर्षानुवर्षे वापरता येते. योग्य देखभालीने ५ ते १० वर्षांपर्यंत आरामात टिकते.
अस्सल कोल्हापूरी चप्पल जीआय टॅगप्राप्त उत्पादकांकडूनच घ्यावी. या टॅगने तिची अस्सलता अधोरेखित होते.
कोल्हापूरी चप्पल घेताना कोल्हापुरातील पारंपरिक कारागिरांकडून किंवा प्रमाणित दुकानांतूनच खरेदी करावी. ऑनलाईन खरेदी करताना "Made in Kolhapur" असलेली उत्पादने निवडावी.