Anuradha Vipat
फळांना लवकर पिकवण्यासाठी आजकाल मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम कार्बाइड किंवा एथिलीन सारख्या केमिकल्सचा वापर केला जातो.
केमिकल असलेली फळे पूर्णपणे एकसारख्या रंगाची दिसतात. उदाहरणार्थ, आंबा किंवा केळी सर्व बाजूंनी अगदी पिवळीधमक दिसतात.
नैसर्गिकरित्या पिकलेल्या फळांवर कुठे हिरवे तर कुठे पिवळे डाग असतात. ती सर्व बाजूंनी एकाच रंगाची नसतात.
जर फळ बाहेरून खूप पिवळे दिसत असेल पण दाबल्यावर ते कडक लागत असेल, तर समजावे की ते औषधाने पिकवले आहे.
केमिकल वापरलेल्या फळांच्या रसात नैसर्गिक गोडवा नसतो. अशा फळांचा गर अनेकदा पांढरट किंवा फिका दिसतो.
जर फळ पाण्यावर तरंगले, तर ते केमिकलने पिकवलेले असण्याची शक्यता जास्त असते.
फळे खाण्यापूर्वी किमान १५-२० मिनिटे कोमट पाण्यात मीठ किंवा बेकिंग सोडा