Shevaga Farming: पानांच्या भरघोस उत्पादनासाठी शेवगा लागवड कशी करावी?

Swarali Pawar

शेवगा पानांना मागणी का?

शेवग्याची पाने पौष्टिक असून आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. म्हणून पानांची पावडर व ताजी पाने यांना चांगला दर मिळतो.

Moringa Leaves | Agrowon

पानांसाठी योग्य जाती

MOLE, PKM-1 आणि PKM-2 या जाती पानांसाठी उत्तम आहेत. या जातींमध्ये फांद्या जास्त येऊन पानांचे उत्पादन वाढते.

Moringa Leaves | Agrowon

सघन लागवड पद्धत

पानांचे उत्पादन वाढवण्यासाठी सघन लागवड फायदेशीर ठरते. ०.९ × ०.९ मीटर अंतरावर लागवड केल्यास एकरी सुमारे ५ हजार झाडे बसतात.

Moringa Leaves | Agrowon

झाडांना आकार देणे

शेवगा झाड लहान असतानाच वरचा देठ कापावा. यामुळे बाजूच्या फांद्या वाढून पानांचे उत्पादन जास्त मिळते.

Moringa Leaves | Agrowon

पहिली कापणी कधी?

लागवडीनंतर साधारण १०० दिवसांनी पहिली कापणी करावी. यानंतर ठराविक अंतराने पाने काढता येतात.

Moringa Leaves | Agrowon

सिंचन व्यवस्थापन

सुरुवातीचे तीन महिने नियमित पाणी देणे महत्त्वाचे आहे. ठिबक सिंचन वापरल्यास पाणी आणि खर्च दोन्ही वाचतात.

Moringa Leaves | Agrowon

खत व्यवस्थापन

लागवडीपूर्वी शेणखत आणि संतुलित रासायनिक खते द्यावीत. प्रत्येक कापणीनंतर थोडे नत्र दिल्यास पानांची वाढ चांगली होते.

Moringa Leaves | Agrowon

शेवगा लागवडीचा फायदा

कमी पाणी, कमी खर्च आणि सतत उत्पादन हे शेवग्याचे फायदे आहेत. योग्य नियोजन केल्यास शेवगा पानांची शेती नक्कीच फायदेशीर ठरते.

Moringa Leaves | Agrowon

Wheat Management: ढगाळ वातावरणात, अवकाळीत गहू पिकाची काळजी कशी घ्यावी?

Agrowon
अधिक माहितीसाठी..