Swarali Pawar
ढगांमुळे सूर्यप्रकाश कमी मिळतो आणि अन्ननिर्मिती घटते. याचा थेट परिणाम गहू उत्पादनावर होऊ शकतो.
ढगाळ वातावरणात तांबेरा व करपा रोग वाढण्याची शक्यता असते. वेळीच उपाय न केल्यास उत्पादनात मोठी घट होऊ शकते.
तांबेरा रोग दिसताच योग्य बुरशीनाशकाची फवारणी करावी. प्रतिबंधक वाणांची निवड केल्यास धोका कमी होतो.
करपा रोग आढळल्यास कॉपर व मॅन्कोझेबयुक्त फवारणी करावी. १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या फायदेशीर ठरतात.
ढगाळ व दमट हवामानात मावा किड वेगाने वाढते. जैविक किंवा गरजेनुसार रासायनिक फवारणी करावी.
ढगाळ हवामानात गहू पिकाला जास्त पाणी देऊ नये. पाण्याच्या पाळ्यांमध्ये अंतर वाढवणे आवश्यक आहे.
वारा व पावसामुळे काही ठिकाणी गहू झोपतो. फुलोरा अवस्थेतील गहू ऊन आल्यावर काही प्रमाणात सावरतो.
सावरलेल्या गव्हासाठी अन्नद्रव्यांची फवारणी उपयुक्त ठरते. योग्य काळजी घेतल्यास उत्पादनाचे नुकसान कमी करता येते.