Bamboo Cultivation : व्यावसायिक बांबू लागवड कशी करावी?

Team Agrowon

बियाणे उपलब्ध असल्यास मार्च, एप्रिल महिन्यामध्ये पेरणी करावी. एक एकरासाठी १०० ते १५० ग्रॅम बियाणे लागते. लागवड ३ बाय ३ बाय ७ मीटर अंतरापर्यंत करण्यात येते.

Bamboo Cultivation | Agrowon

पाच बाय पाच मीटरवर लागवड केल्यास हेक्‍टरी ४०० रोपे बसतात.

Bamboo Cultivation | Agrowon

बांबूबेट दरवर्षी पसरते. कालावधी ३५-४० वर्षांचा असल्याने जास्त अंतरावर लागवड करावी. परिणामी वाढही चांगली होते, तोडणीस अडचण येत नाही.

Bamboo Cultivation | Agrowon

लागवडीसाठी एप्रिल-मेमध्ये प्रत्येकी ५ मीटर अंतरावर ६० बाय ६० बाय ६० सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत.

Bamboo Cultivation | Agrowon

रोपांपासून लागवड करावयाची असल्यास ३० बाय ३० बाय ३० सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत.

Bamboo Cultivation | Agrowon

कंदाचा आकार मोठा असल्यास त्यानुसार खड्ड्याचा आकार वाढवावा. खड्ड्यांत पावसाळ्यापूर्वी माती भरावी. त्यात एक घमेले कुजलेले शेणखत, ५० ग्रॅम अमोनिअम सल्फेट, २०० ग्रॅम सुपर फॉस्फेट मिसळावे.

Bamboo Cultivation | Agrowon

पुरेशा पावसानंतर लागवड करावी. खड्ड्यांमध्ये कंद, पॉलिथिन पिशवीत किंवा गादीवाफ्यावर वाढविलेली रोपे मुळांना इजा होणार नाही अशा तऱ्हेने मातीसह काढून लावावीत.

Bamboo Cultivation | Agrowon