Climate Impact on Poultry: हवामान बदलाचा कुक्कुटपालनाला फटका! जाणून घ्या काय होतात परिणाम!

Swarali Pawar

कोंबड्यांचं उत्पादन कमी झालंय का?

वाढत्या उन्हामुळे कोंबड्यांचं वजन आणि अंडी उत्पादन कमी होतंय का? तर हवामान बदलाचा परिणाम तुमच्या कुक्कुटपालनावर होत असू शकतो.

Poultry Yield | Agrowon

उष्णतेचा शरीरावर परिणाम

जास्त तापमानामुळे कोंबड्यांवर ताण येतो. त्यांचा श्वास वेगाने चालतो आणि शरीरातील संतुलन बिघडते.

Heat Stress | Agrowon

अंड्यांच्या टरफलांवर परिणाम

उष्णतेमुळे शरीरातील कॅल्शियम कमी होते. म्हणून अंड्यांची टरफलं पातळ आणि कमजोर होतात.

Impact on Eggs | Agrowon

पिल्लांची वाढ का मंदावते?

खूप गरम वातावरणात पिल्लांना जुळवून घेणं कठीण जातं. त्यामुळे त्यांची वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाही.

Layer productivity decline | Agrowon

खाद्य सेवन कमी

उष्णतेत कोंबड्या कमी खाद्य खातात. यामुळे वजन वाढ थांबते आणि मांसाची गुणवत्ता घटते.

Poultry feed intake reduction | Agrowon

रोगांचा धोका वाढतो

उष्णतेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण वाढू शकते.

Poultry disease spread in heat | Agrowon

आर्थिक तोटा

उत्पादन घटल्यामुळे थेट उत्पन्न कमी होते. याचा फटका शेतकऱ्यांच्या खिशाला बसतो.

Economic loss in poultry farming | Agrowon

वेळेवर उपाय गरजेचे

उष्णतेपासून संरक्षण आणि योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. हवामान बदल लक्षात घेऊन नियोजन केल्यास उत्पादन टिकवता येते.

Poultry Production | Agrowon

Egg Incubation at Home: नैसर्गिक अंडी उबवणूक: कमी खर्चात निरोगी पिल्ले कशी मिळवायची

Agrowon
अधिक माहितीसाठी...