Swarali Pawar
यंदा कमी पावसाचा अंदाज असल्याने पाणी साठवणं गरजेचं आहे. जलसंधारणाची कामे वेळेत केल्यास शेतीला मोठा फायदा होतो.
दर २-३ वर्षांनी खोल नांगरणी केल्यास माती मोकळी होते. यामुळे पाणी जमिनीत जास्त प्रमाणात मुरते.
घळीवरील दगडी बांध मजबूत आणि व्यवस्थित रचून घ्या. साचलेली माती काढून शेतात वापरा.
बांधाला पडलेल्या भेगा आणि खिंडारे बुजवा. सांडव्यातील दगड आणि तळाची साफसफाई करा.
सलग समतल चरातील गाळ काढून बाजूला टाका. यामुळे चरांची पाणी साठवण्याची क्षमता वाढते.
शेततळ्यातील गाळ आणि झाडाझुडुपे काढून टाका. पाणी झिरपू नये म्हणून अस्तरीकरण व्यवस्थित करा.
विहिरीतील गाळ काढून पुनर्भरणाची व्यवस्था करा. यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होते.
जलसंधारणाची कामे सामूहिकरीत्या केल्यास परिणाम चांगले मिळतात. पाणी वाचवल्यास भविष्यात शेती टिकवणं सोपं होतं.