Swarali Pawar
पेरणीपूर्वी एकरी १ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. हे जमिनीचा पोत सुधारते, पाणी धारणक्षमता वाढवते आणि सूक्ष्मजीव वाढवते.
अॅझोटोबॅक्टर आणि पी.एस.बी. ही जैविक खते ज्वारीसाठी उपयुक्त आहेत. पेरणीपूर्वी २५० ग्रॅम खत १० किलो बियाण्याला चोळून वापरावे. यामुळे उगवण सुधारते आणि पिकाला नैसर्गिकरित्या नत्र-स्फुरद मिळते.
कोरडवाहू ज्वारीसाठी ५०:२५:२५ किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टर आणि बागायतीसाठी ८०:४०:४० किलो प्रमाण वापरावे. अर्धे नत्र पेरणीवेळी, उरलेले ताटवे फुटल्यावर द्यावे.
कोरडवाहू ज्वारीसाठी ४० किलो युरिया, ६० किलो एसएसपी, २५ किलो एमओपी द्यावे. बागायतीसाठी ३५ किलो युरिया, १०० किलो एसएसपी आणि २५ किलो एमओपी वापरावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी ३५ किलो युरिया द्यावे.
कोरडवाहू पिकासाठी ४० किलो १०:२६:२६ आणि ३५ किलो युरिया वापरावे. बागायतीसाठी ६० किलो १०:२६:२६ आणि २० किलो युरिया द्यावे. ३० दिवसांनी दोन्ही जमिनीसाठी ३५ किलो युरिया द्यावा.
कोरडवाहू ज्वारीसाठी पेरणीच्या वेळी २५ किलो डीएपी, २५ किलो युरिया आणि १५ किलो एमओपी द्यावे. बागायतीसाठी ३५ किलो डीएपी, २० किलो युरिया आणि २५ किलो एमओपी द्यावे. ३० दिवसांनी ३५ किलो युरिया द्यावा.
कोरडवाहू ज्वारीसाठी ६० किलो १८:१८:१० आणि २० किलो युरिया वापरावे. बागायतीसाठी ९० किलो १८:१८:१० आणि १० किलो एमओपी द्यावे. ३० दिवसांनी दोन्हींसाठी ३५ किलो युरिया द्यावा.
२०:२०:० खत वापरताना कोरडवाहूसाठी ५० किलो, २० किलो युरिया आणि १५ किलो एमओपी द्यावे. बागायतीसाठी ८० किलो खत व २५ किलो एमओपी द्यावे.
१२:३२:१६ खत वापरताना कोरडवाहूसाठी ३५ किलो खत आणि ३० किलो युरिया, तर बागायतीसाठी ५० किलो खत, २० किलो युरिया व १० किलो एमओपी वापरावे.