Anuradha Vipat
अंडरआर्म्सचा काळेपणा ही एक सामान्य समस्या आहे, जी सतत येणारा घाम, घट्ट कपडे किंवा डिओड्रंट्सचा थेट वापर केल्यामुळे उद्भवू शकते.
एक छोटा बटाटा किसून त्याचा रस काढून हा रस किंवा चकती अंडरआर्म्सवर १० ते १५ मिनिटे चोळा आणि नंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ धुवा.
बेकिंग सोडामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट अंडरआर्म्सवर लावून २ मिनिटे हलक्या हाताने स्क्रब करा आणि ५ मिनिटांनी धुवून टाका.
१ चमचा बेसन, १ चमचा दही आणि चिमूटभर हळद एकत्र करून घट्ट लेप बनवा. अंघोळीपूर्वी हा पॅक अंडरआर्म्सवर १५ मिनिटे लावून ठेवा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.
ताज्या कोरफडीच्या पानातून त्याचा नैसर्गिक गर काढा. हा गर रोज अंघोळीपूर्वी १५ ते २० मिनिटे काखेत लावून ठेवा आणि नंतर धुवून घ्या.
रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा अंघोळीच्या १० मिनिटे आधी शुद्ध खोबरेल तेलाचे काही थेंब घ्या.
खोबरेल तेलामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते, जे नियमित वापराने काळी पडलेली त्वचा मऊ आणि उजळ बनवते.