Anuradha Vipat
तोंडातून दुर्गंधी येणे ही एक अत्यंत सामान्य समस्या आहे .
तोंडात जमा होणारे बॅक्टेरिया, दातांची अपुरी स्वच्छता आणि अपचन ही याची मुख्य कारणे असतात.
सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी मऊ ब्रिस्टल्स असलेल्या ब्रशने कमीत कमी २ मिनिटे दात स्वच्छ घासणे आवश्यक आहे
रोज सकाळी टंग क्लिनरच्या साहाय्याने जीभ हलक्या हाताने स्वच्छ करा.
तोंडातून वास येत असल्यास १ लवंग किंवा वेलची तोंडात ठेवून चघळा.
जेवण झाल्यानंतर रोज १ चमचा बडीशेप खाल्ल्याने लाळ तयार होण्यास मदत होते.
कोमट पाण्यात थोडे जाडे मीठ टाकून दिवसातून २ ते ३ वेळा गुळणे करा.