Anuradha Vipat
घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने हेअर स्पा केल्याने केसांना खोलवर पोषण मिळते
खोबरेल तेल, बदामाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईल कोमट करा. बोटांच्या टोकांनी टाळूवर आणि केसांच्या मुळांशी १०-१५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.
एक सुती टॉवेल गरम पाण्यात बुडवून घट्ट पिळून घ्या. हा कोमट टॉवेल तुमच्या केसांवर १० ते १५ मिनिटे गुंडाळून ठेवा.
केसांच्या गरजेनुसार एक नैसर्गिक मास्क बनवून केस आणि टाळूवर ३० मिनिटांसाठी लावून ठेवा
३० मिनिटांनंतर केस कोमट किंवा थंड पाण्याने धुवा. केस धुण्यासाठी रासायनिक शॅम्पूऐवजी सौम्य शॅम्पू किंवा हर्बल शॅम्पूचा वापर करा.
शॅम्पूनंतर नैसर्गिक कंडिशनर म्हणून तुम्ही पाण्यात थोडे सफरचंद सायडर व्हिनेगर मिक्स करून त्याने केस धुवू शकता.
केस सुकल्यावर हलकेसे हेअर सिरम किंवा बदामाच्या तेलाचे २ थेंब हातावर चोळून केसांना लावा.