Swarali Pawar
९ ते ११ महिन्यांचे शुद्ध व निरोगी बेणे वापरावे. चांगल्या बेण्यामुळे १५ ते २० टक्के उत्पादन वाढते.
बेणे जाड, रसाळ आणि फुगीर डोळ्याचे असावे. दर तीन वर्षांनी बेणे बदलणे फायदेशीर ठरते.
को. ८६०३२, फुले २६५, फुले १०००१, फुले ऊस १५०१२, फुले ऊस १३००७ आणि फुले ऊस १५००६ या भरघोस उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करा.
बेणेप्रक्रियेमुळे रोग व कीड कमी होते. पीक सुरुवातीपासून मजबूत वाढते.
बेणे जिवाणू खताच्या द्रावणात 30 मिनिटे बुडवावे. यामुळे रासायनिक खतांची बचत होते.
उसामध्ये कांदा, भेंडी, चवळी, पालक अशी पिके घ्यावीत. यामुळे जादा उत्पन्न मिळते.
टरबूज, काकडी, भुईमूग, सूर्यफूल सुद्धा घेता येतात. शेतीचा खर्च कमी होतो आणि नफा वाढतो.
योग्य नियोजन केल्यास सुरु उसातून भरघोस उत्पादन मिळते. आजच योग्य जात, बेणेप्रक्रिया आणि आंतरपीक अवलंबा.