Swarali Pawar
महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत प्रचंड मुसळधार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली
मूर्तीजापूर तालुक्यातील लाखपूरी सर्कलमध्ये ढगफुटी सदृश पावसाने शेतात पाणीच पाणी झाले. लाखपुरी सर्कलसह दुर्गवाडा, दातवी, मंगरूळ कांबे, जांभा खुर्द आणि बुद्रूक, उम्ई, आणि इतर गावांनाही या मुसळधार पावसाचा फटका बसला.
जांभा गावात शेतकरी राजू वानखडे यांच्या शेतात पाणीच पाणी झाले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
पश्चिम विदर्भात मूर्तीजापूरसह रिसोड आणि तालुक्यांतही पावसाने मोठी हानी केली. शेतातील चांगले उभारलेले पीक आडवे झाले.
अमरावती जिल्ह्यात सोयाबीन, तूर, कपाशीची पिके पाण्याखाली गेली. पिकांची नासधूस झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाचे थैमान. कापूस आणि सोयाबीन पिकांना फटका बसला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लोहगावच्या रस्त्यावरही पाणी वाहिले. लोहगाव दिन्नापूर रोडवरील खार ओढ्याला पुर आला होता.
गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.. त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या भागात सरकारने लवकर पंचनामे करावे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.