Crop Damage Compensation: वन्यप्राण्यांच्या हल्ल्यानंतर पिकाची नुकसान भरपाई कशी मिळवावी?

Swarali Pawar

कोणत्या प्राण्यांमुळे नुकसान?

रानडुक्कर, हरिण, रानगवा, नीलगाय, माकड, वानर आणि हत्ती यांच्या हल्ल्यामुळे पिकांचे व फळझाडांचे नुकसान होते.

Wild Animals | Agrowon

त्वरित अर्ज

नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत अर्ज करावा लागतो. हा अर्ज "नमुना ३" मध्ये वनक्षेत्रपालाकडे द्यावा लागतो.

Compensation Application | Agrowon

पंचनाम्यासाठी समिती

वनरक्षक, कृषी सहायक व तलाठी यांची समिती नुकसानीचा पंचनामा करते. अर्ज मिळाल्यानंतर १० दिवसांत हा अहवाल सादर करावा लागतो.

Wildlife attack in crops | Agrowon

हत्तीमुळे नुकसान झाल्यास

हत्तीमुळे मालमत्तेचे नुकसान झाल्यासही ७२ तासांत अर्ज आवश्यक. कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक आणि तलाठी पंचनामा करतात.

Damage Due to Elephant | Agrowon

तपासणीची पद्धत

वनरक्षक प्राण्यांचे ठसे, विष्ठा व हालचाल तपासतो. तलाठी क्षेत्र अर्जदाराचेच आहे का हे पाहतो आणि कृषी सहायक नुकसानीचे मोजमाप करतो.

Crop Damage | Agrowon

भरपाई कशी ठरते?

समिती नुकसानग्रस्त क्षेत्रातील पिकांची टक्केवारी नोंदवते. कृषी विभाग त्या पिकाची मागील ५ वर्षांची सरासरी उत्पादकता तपासतो.

Compensation of Damage | agrowon

हमीभावावर आधारित भरपाई

नुकसानीच्या प्रमाणानुसार हमीभावाच्या आधारे भरपाई दिली जाते. पिकांचे नुकसान जितके जास्त, भरपाईही तितकी जास्त मिळते.

Compensation on msp | Agrowon

शेतकऱ्यांसाठी दिलासा

पूर्ण कागदपत्रांसह अर्ज दिल्यानंतर एका महिन्यात भरपाई मिळते. विलंब झाल्यास शासनाला ६% व्याजासह रक्कम द्यावी लागते.

Compensation for Farmers | Agrowon

Livestock Compensation: वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशुधनाचे नुकसान झाल्यास भरपाई कशी मिळवावी? किती मिळते शेतकऱ्यांना भरपाई?

अधिक माहितीसाठी