Aslam Abdul Shanedivan
देशात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सर्वात आधी रेल्वेचा विचार केला जातो. त्यासाठी महिनो महिने आधी तिकीट बूक केले जाते.
मात्र जर रेल्वे प्रवासादरम्यान आपले तिकीट हरविले किंवा फाटले तर काय करायचं? असा प्रश्न अनेकांना पडतो
प्रवासात तिकीट हरवल्यास डुप्लिकेट तिकीट काढता येते. तेही नाममात्र रक्कमेत. त्यासाठी फक्त टीटीईला सांगावे लागेल. यानंतर एका पावतीनंतर आपल्याला तिकीट मिळून जाईल
प्रवासात तिकीट हरवल्यास डुप्लिकेट तिकीटासाठी टीटीई पावती करून देईल. त्यासाठी आपल्याला फक्त फक्त ५० रू चार्ज द्यावा लागतो
प्रवासा दरम्यान तुम्ही स्लीपर किंवा सेंकड क्लासमधून प्रवास करत असाल आणि तिकीट हरवल्यास आपल्याला डुप्लिकेट तिकीटासाठी १०० रूपये मोजावे लागतील
प्रवासा दरम्यान तिकीटच फाटले तर आपल्याला डुप्लिकेट तिकीटासाठी प्रवासाच्या भाड्याच्या २५ टक्के रक्कम मोजावी लागेल
याआधी प्रवासा दरम्यान आपले तिकीट वेटिंगवर असले तरी तुम्हाला स्लीपर कोचमधून प्रवास करता येत होता. पण आता नव्या नियमाप्रमाने तसा प्रवास करता येणार नाही.